Thursday 29 June 2017

डॉक्टर तुम्ही असायला हवे होता...!



जादूटोणा विरोधी बिल विधान सभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेणे अतिशय अवघड ब्बाब होती .विरोधक सभागृहा बाहेर एक बोलायचे तर सह्बागृहाचे आत कडाडून विरोध करायचे . विरोधकांचे या कुटील नीतीला धोबी पछाड करून हे बिल मंजूर करून घेण्यासाठी उत्कृष्ट फ्लोअर म्यनेजमेंट करणारे संसदीय कामकाज मंत्री मा हर्षवर्धन पाटील यांचे आभार ...!
या लढ्यातील एक सच्चे अनिस साथी आमदार मा कपिल पाटील यांचे आभार मानावे तेव्हडे थोडेच ..! सभागृहाचे आत आणि रस्त्यावरील लढाईतील सर्वात समोर असणारा हा खरा जनप्रतिनिधी . जन आंदोलनाच्या मुशीतून तयार झालेला निर्भीड पत्रकार युवराज मोहिते व सर्व कलमनामाची टीम या सर्वांचे अभिनंदन व आभार

मनाच्या कोपऱ्यात एक सल मात्र सतत राहील कि , हे बिल चार महिन्यांपूर्वी मजूर झाले असते तर आज डॉ नरेंद्र दाभोलकर यांची थाप चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीवर पडली असती.
डॉक्टर तुम्ही आज असायला हवे होता ...!


64व्या संविधान दिनाच्या शुभेच्छा! प्रथम सर धन्यवाद आठवणी पुनः जागवल्या बद्दल.... पण थोडे से वेगळे....संविधान संविधान म्हणून आपण ज्याचे नेहमी गोडवे , स्तुती सुमने गातो .....पण मात्र त्याच संविधानावर वर हाथ ठेवून मी खरे बोलेल खोटे बोलणार नाही असे का म्हणत नाही ... मात्र तिथे आपणाश धर्मग्रंथ लागतो.... आणि अश्या धर्मग्रंथावर हाथ ठेवून धर्मावर आपली मक्तेदारी सांगणारे सुद्धा नित्याने खोटेच बोलतात मग हेय एक प्रकार धार्मिक भवनाचा अनादर करणे होणार नाही का ? म्हणजे शेवटी कायद्याला सुद्धा धर्माचाच आधार घ्यावा लागतो असे म्हणणे चुकीचे ठरेल का आणि मात्र अश्यात आपण कसे मग दाभोलकाराचा लढा योग्य दिशेने पुढे नेणार? . ... निश्चित मग तिथे कोणीच मग मिडिया का असे कोणाचा ब्र निघणार नाही...... माझ्या बोलण्यात काही चूक असेल तर मी आपला क्षमस्व आहे ..

No comments:

Post a Comment