Friday 9 May 2014

आई!

                                                            

                            

आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेला गाव असतं
सोबत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठेच तरीही नाही म्हणत नाही
... जत्रा पांगते पात उठतात
पोरक्या जमिनीत उमले दाटतात
आई मनामनात तसीच ठेवून जाते काही
जीवाचा जिवालाच कळावं असे देऊन जाते काही
आई असतो एक धागा
वातीला उजेड देणारी समयीतील जागा
घर उजळतं तेव्हा तिचं राहत नाही भान
विझून गेली अंधारात
कि शोधायला कामिपाडता रान
आई घरात नाही
तर मग कुणाशी बोलायचा
आई खरच काय असते
लेकुराची माई असते
वासराची गाई असते
लंगड्याचा पाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरत हि नाही अन उरत हि नाही