Thursday 29 June 2017

भारत-पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ ...

Anc:- उपखंडातील प्रेक्षकांना ज्या सामन्याची उत्कंठा असते तो सामना आज संध्याकाळी सुरु होणार आहे. भारत-पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ ज्यावेळी समोरासमोर उभे टाकतात, त्यावेळी नेहमीच चाहत्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो. याबद्दल आपण आज आपल्या प्रतिनिधी यांचे मत जाणून घेऊ. तसेच पिच बद्दल जाणून घेऊयात.


Vo.1:-  मोहिम सुरु केली होती टी-२० विश्वकरंडक जिंकण्याची; परंतु दुसऱ्याच सामन्यात 'आर या पार ' ची लढाई लढण्याची वेळ 'टीम इंडिया ' वर आली आहे. आणि ही क्रिकेट मैदानावरची लढाई आहे, ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध! पाकने सलामीची लढत जिंकून गुणांचे खाते उघडले; तर अजूनही खात्यात भोपळा असलेल्या टीम इंडियाला आव्हान राखण्यासाठी जिंकण्याशिवाय पर्याय नाही.

SOT 1:- विशाल खांडेकर (डेक्कन क्रिकेट क्लब) प्रशिक्षक
या स्पर्धेपूर्वी ११ पैकी १० विजय मिळवल्यामुळे साहजिकच टीम इंडियाकडे हॉट फेवरेट म्हणून पहिले जात आहे. परंतु सलामीलाच न्यूझीलंड विरुद्ध बेजबाबदार फलंदाजीमुळे पराभवाचा धक्का बसला असे मला वाटते.

Vo.2:- पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा सामना धरमशाळेमध्ये होणार होता; परंतु बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर ऐतिहासिक ईडन गार्डन येथे सामना हलवण्यात आला. ईडन गार्डन चा इतिहास पाकिस्तानच्या
बाजूने राहिलेला आहे . ही बाब भारतासाठी अतिशय चिंताजनक आहे .

SOT 3:- (द्वारकानाथ संझगिरी, क्रिकेट समीक्षक)
भारत-पाक हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी यांच्या शेजारीच असलेल्या ढाक्यामध्ये काही दिवसापूर्वी एकमेकांविरूद्ध लढले होते. त्यावेळीची खेळपट्टी काहीशी ओलसर होती. अडखळत्या सुरूवातीनंतर भारताने तो सामना जिंकला होता. त्या सामन्यानंतर दोन्ही संघांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळे शनिवारच्या सामन्यासाठी चांगली तयारी करण्यास वेळ मिळाला. कोलकाता हे ढाक्यापेक्षा फार लांब असले नसले तरी  ईडन गार्डनची खेळपट्टी ती फिरकीला साथ देणारी असेल. विजय अत्यावश्यक असल्यामुळे भारतावर अधिक दडपण असेल. जर पराभव झाला तर आव्हान संपल्यात जमा होईल.

SOT 3:- (शरद बोदगे क्रिकेटर, डेक्कन क्रिकेट क्लब)
धोनी आणि आफ्रिदीची कर्णधार म्हणून तुलनाच  होऊ शकत नाही . प्रामुख्याने झटपट क्रिकेटमध्ये धोनीचे अपयश हे अपवादात्मक आहे. दुसरीकडे आफ्रिदीला कर्णधार म्हणून अपवादाने यश मिळाले आहे. आशिया करंडकापूर्वी कोलकात्यात निवृत्तीबद्दल विचारणा झाली, तेव्हा धोनीने आधी पत्रकार परिषदेत आणि मग आशिया करंडक जिंकून टीकाकारांना चपराक दिली. दुसरीकडे आशिया करंडकात अंतिम फेरीही गाठता न आल्यामुळे आफ्रिदी टीकेचा धनी झाला. विश्वकरंडकानंतर आफ्रिदीला निवृत्त होण्यास भाग पडेल. सलामीच्या सामन्यात आफ्रिदी 'सामनावीर' ठरला; तर धोनीला संघास विजयी करता आले नाही. या पार्श्वभूमीवर या लढतीपूर्वी मात्र आफ्रिदीवर नव्हे तर धोनीवर दडपण असेल.

Vo.3:- विश्वकरंडक टी -२० स्पर्धेत उभय प्रतिस्पर्धी चार वेळा आमने-सामने आले आहेत. चारही सामन्यात भारताची सरशी झाली आहे. दुसरीकडे  ईडन गार्डनवर भारताविरुद्ध चारही वन-डे मध्ये पाकिस्तानने बाजी मारली आहे. यापैकी कोणती यशोमालिका खंडित होणार ही उत्सुकता आहे.

PTC.:- व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधव सह मी अनिकेत वाणी IBN-LOKMAT पुणे.  


No comments:

Post a Comment