Thursday 29 June 2017

Internship Report

महाराष्ट्रातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्या पैकी आयबी-एन लोकमत (IBN-LOKMAT) वृत्तवाहिनीच्या पुणे ब्युरो मध्ये ३१ दिवस इंटर्नशिप केली. पुण्याचे आयबी-एन लोकमतचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. IBN-लोकमत वृत्तवाहिनी मध्ये काम करण्याचा अनुभव फारच वेगळा आणि नवीन काहीतरी शिकवणारा होता. फिल्डवर काम करण्याचा अनुभव हा एक बातमीदार म्हणून बातमी कशी कव्हर करायची, कॅमेरा कसा फेस करायचा, बूम कशाप्रकारे हाताळायचा, बाईट कसा घ्यायचा याची माहिती IBN-लोकमतची रिपोर्टर हलीमा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बातमीदारी करताना समजून घेता आल्या. तसेच मुंबईमध्ये लोअर परेल येथे असणाऱ्या मुख्य ऑफिस मधील न्यूजरूम मध्ये काम करताना विविध तांत्रिक बाबींचे ज्ञान घेण्याचा अनुभव आला.


         इंटर्नशिप करताना टेलिव्हिजन क्षेत्रातातील विविध सर्वसाधारण संकल्पना काय-काय  आणि कोणत्या प्रकरच्या आहेत ते शिकावयास मिळाले. त्या संकल्पना पुढील मुद्यांच्या आधारे स्पष्ट करता येतील:-
१)बाईट(Bite):- बाईट म्हणजे समोरच्या व्यक्तीचे मत विचारात घेणे. घडलेल्या घटनेची दुसरी बाजू समजून घेणे. एकप्रकारे छोटासा इंटरव्ह्यू घेतला जातो. तो २ ते ३ मिनिट पेक्षा जास्त नसावा.
२)चौपाल:- एखादी जर काही मोठी घटना घडलेली असेल तर त्याविषयी चार ते पाच व्यक्तीचा गट किंवा समूह एकत्र येऊन बाईट देतात. ते live link असते किंवा recording असते.
३)live link:- ब्रेकिंग न्यूज ज्यावेळी असते त्यावेळी रिपोर्टर किंवा ब्युरो चीफ थेट माहिती देत असतो. तो ही माहिती देत असताना visual हे direct O.B. van द्वारे जोडून देण्यात येते. तसेच बाईट, ओपिनियन घेण्यात येतात.  
४)Tic-tac:- Tic-tac म्हणजे वन टू वन बातचीत असते. म्हणजे एक व्यक्ती समोरासमोर त्या व्यक्तीचा interview घेते. काही वेळेस एखाद्या घटनेविषयी विविध प्रश्नांची बरसात त्या व्यक्तीवर करण्यात येते. काही वेळेस तर घटनेचा बाईट नसेल तर दुसऱ्या चॅनल वरून घेण्यात येते. आणि footage tic-tac करण्यात येते.
५)Walkthrough:- एखाद्या घटनेविषयी जर त्या बातमीचे विश्लेषण बातमीदार स्वतःच बूम घेऊन चालत-चालत करतो. हे साधारण तीन मिनिट पेक्षा जास्त नसावे. यामध्ये तो बातमीदार दृश्य स्वरूपातील घटनेचे वर्णन करत असतो.
६)nodding:- जर एखाद्या घटनेबाबत live link असेल तर त्यावेळी रिपोर्टर किंवा ब्युरो चीफ यांच्या कानात A.P म्हणजे earphone देण्यात आलेला असतो अशा वेळी स्टुडिओ मधून अँकर त्याच घटनेविषयी बोलत असतो किंवा प्रश्न विचारात असतो त्यावेळी मान हालवून कॅमेरा समोर प्रतिसाद देणे याला Nodding असे म्हणतात.
७)Vox-Pop:- Vox-Pop म्हणजे एखाद्या घटनेबाबत विविध व्यक्तींचे त्याच विषया संदर्भात मत विचारात घेतले जातात, त्याला Vox-Pop असे म्हणतात. हे Vox-Pop सर्वसाधारण सामान्य व्यक्तींचे घेतले जातात.
८)Phono:- एखादी घटना जर खूप मोठी असेल आणि त्याविषयी visual नसतील तर बातमीदाराचा फोनो घेतला जातो. फोन वरून त्याला प्रश्न विचारले जातात. विविध मान्यवरांचे देखील अशा वेळी फोनो घेतले जातात.
९)Camera Shoots:- बातमी जर खूप मोठी असेल तर अशावेळी सर्वसाधारण Anc-Pakage करण्यात येते. त्यावेळी visuals फार मोठया प्रमाणावर घेण्यात येतात. काही वेळेस तर बातमीदार नसताना देखील व्हिडीओ जर्नलिस्ट जाऊन बाईट करून येतो.
१०)PTC:- न्यूज चॅनल मध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे peece to camera हा असतो. कारण ज्यावेळी बातमीदार एखादी बातमी करतो त्यावेळी ती बातमी पूर्ण केल्यानंतर स्वःताचे नाव,ज्या ठिकाणची घटना आहे त्या गावाचे नाव, न्यूज चॅनलचे नाव हे घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण बातमीची विश्वासार्हता यावरून स्पष्ट होते.
       IBN-लोकमत मध्ये इंटर्नशिप करताना विविध ठिकाणी बातमी कव्हर करण्यासाठी जाण्याची संधी मला प्राप्त झाली. वेगवेगळ्या बीट्स वरच्या बातम्या कशाप्रकारे हाताळायच्या याचे संपूर्ण ज्ञान या एक महिन्याच्या कालावधी मध्ये मला घेता आले. टेलिव्हिजन क्षेत्रात फिल्डवर काम करण्याचा अनुभव हा प्रिंट मिडिया पेक्षा वेगळा होता.



 त्यातील काही महत्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:-
१)      नदीपात्रातील राडारोडा
२)      BRT चा उडाला बोजवारा
३)      पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके स्टिंग ऑपरेशन. (टेंडर घोटाळा)
४)      पाच राज्यांचा निवडणूक निकाल
५)      वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा आवश्यक सुप्रीमकोर्टाचा निर्णय.
६)      दहावी आणि बारावीचा निकाल
७)      पुण्यात चक्क पेन मधून भागवलं हुक्काबाजीच व्यसन
८)      पुण्यातील नालेसफाई!
९)      पुणे महापालिकेची सर्वसाधारण बैठक
१०)  प्राची शहा आणि नदीपात्रातील रस्ता.....
११)  विनोद तावडे यांची गडकिल्ले संवर्धन मोहीम या संदर्भातील पत्रकार परिषद
१२)  अहिल्यादेवी यांची जयंती निमित्ताने नगर जिल्ह्यातील वसमत चोंडी येथील पुतळा वितरणाचा कार्यक्रम
१३)  NDA ची परेड
१४)  महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा ५०वा वर्धापनदिन
१५)  पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांची पुण्यातील प्रश्नाबाबत पत्रकार परिषद
१६)  भाजपचा राष्ट्रीय कार्यकारणीचा मेळावा
१७)  आषाढी वारी देहू,आळंदी ते पुणे
१८)  जेधे पुलाचे उद्घाटन आणि अजित पवार यांचा बाईट
१९)  मधुमेहाचे वाढते प्रमाण यावर घेतलेले रुबी हाँल रुग्णालयातील चर्चासत्र
२०)  रोज IBN-लोकमत वृत्तवाहिनीची डिबेट बेधडक   
   
  
    जितके बोलावे तितके कमीच आहे! महाराष्ट्रात गेल्या २० वर्षात टेलिव्हिजन क्षेत्रात असे न्यूज चॅनल झाले नाही, याचे कारण अगोदर निखिल वागळे आणि आता महेश म्हात्रे, मंदार फणसे यांच्यासारख्या संपादकांमुळे खरी पत्रकारिता टिकून आहे. परिपूर्ण, परिपक्व, अभ्यासपूर्ण टीम या सर्वांनी मिळून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वाससंपादन करण्यात यश मिळवलेले दिसते. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय या सर्व क्षेत्रातील विविध महत्वपूर्ण विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेले आहेत. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांना कायमच IBN-लोकमतचा पत्रकारितेचा चौथा स्तंभ म्हणून धाक वाटत राहिला आहे. ६ एप्रिल २००८ यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर “IBN-लोकमत” ची स्थापना करण्यात आली. राष्ट्र-महाराष्ट्र, बेधडक, शो-टाईम, दिवसभराच्या बातम्या, स्पीड-न्यूज, लंच टाईम, सिटी-न्यूज, न्यूजरूम बुलेटीन हे सर्व कार्यक्रम IBN-लोकमतची ओळख आहे. लोकशाही मार्गाने राज्यघटनेने दिलेली सर्व हक्क, अधिकार, कर्तव्ये या वृत्तवाहिनीने बजावली आहेत. अनेक पुरस्कार देखील पटकावले आहे. IBN-लोकमतने टेलिव्हिजन क्षेत्रातील पत्रकारितेला मोठया उंचीवर नेऊन ठेवले आहे. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ आहे, हे दर्शवून दिले.

               “अचूक बातमी ठाम मत, पाहा फक्त IBN-लोकमत.” 

भारत-पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ ...

Anc:- उपखंडातील प्रेक्षकांना ज्या सामन्याची उत्कंठा असते तो सामना आज संध्याकाळी सुरु होणार आहे. भारत-पाकिस्तान हे दोन पारंपरिक संघ ज्यावेळी समोरासमोर उभे टाकतात, त्यावेळी नेहमीच चाहत्यांचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला असतो. याबद्दल आपण आज आपल्या प्रतिनिधी यांचे मत जाणून घेऊ. तसेच पिच बद्दल जाणून घेऊयात.


Vo.1:-  मोहिम सुरु केली होती टी-२० विश्वकरंडक जिंकण्याची; परंतु दुसऱ्याच सामन्यात 'आर या पार ' ची लढाई लढण्याची वेळ 'टीम इंडिया ' वर आली आहे. आणि ही क्रिकेट मैदानावरची लढाई आहे, ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध! पाकने सलामीची लढत जिंकून गुणांचे खाते उघडले; तर अजूनही खात्यात भोपळा असलेल्या टीम इंडियाला आव्हान राखण्यासाठी जिंकण्याशिवाय पर्याय नाही.

SOT 1:- विशाल खांडेकर (डेक्कन क्रिकेट क्लब) प्रशिक्षक
या स्पर्धेपूर्वी ११ पैकी १० विजय मिळवल्यामुळे साहजिकच टीम इंडियाकडे हॉट फेवरेट म्हणून पहिले जात आहे. परंतु सलामीलाच न्यूझीलंड विरुद्ध बेजबाबदार फलंदाजीमुळे पराभवाचा धक्का बसला असे मला वाटते.

Vo.2:- पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार हा सामना धरमशाळेमध्ये होणार होता; परंतु बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर ऐतिहासिक ईडन गार्डन येथे सामना हलवण्यात आला. ईडन गार्डन चा इतिहास पाकिस्तानच्या
बाजूने राहिलेला आहे . ही बाब भारतासाठी अतिशय चिंताजनक आहे .

SOT 3:- (द्वारकानाथ संझगिरी, क्रिकेट समीक्षक)
भारत-पाक हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी यांच्या शेजारीच असलेल्या ढाक्यामध्ये काही दिवसापूर्वी एकमेकांविरूद्ध लढले होते. त्यावेळीची खेळपट्टी काहीशी ओलसर होती. अडखळत्या सुरूवातीनंतर भारताने तो सामना जिंकला होता. त्या सामन्यानंतर दोन्ही संघांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामुळे शनिवारच्या सामन्यासाठी चांगली तयारी करण्यास वेळ मिळाला. कोलकाता हे ढाक्यापेक्षा फार लांब असले नसले तरी  ईडन गार्डनची खेळपट्टी ती फिरकीला साथ देणारी असेल. विजय अत्यावश्यक असल्यामुळे भारतावर अधिक दडपण असेल. जर पराभव झाला तर आव्हान संपल्यात जमा होईल.

SOT 3:- (शरद बोदगे क्रिकेटर, डेक्कन क्रिकेट क्लब)
धोनी आणि आफ्रिदीची कर्णधार म्हणून तुलनाच  होऊ शकत नाही . प्रामुख्याने झटपट क्रिकेटमध्ये धोनीचे अपयश हे अपवादात्मक आहे. दुसरीकडे आफ्रिदीला कर्णधार म्हणून अपवादाने यश मिळाले आहे. आशिया करंडकापूर्वी कोलकात्यात निवृत्तीबद्दल विचारणा झाली, तेव्हा धोनीने आधी पत्रकार परिषदेत आणि मग आशिया करंडक जिंकून टीकाकारांना चपराक दिली. दुसरीकडे आशिया करंडकात अंतिम फेरीही गाठता न आल्यामुळे आफ्रिदी टीकेचा धनी झाला. विश्वकरंडकानंतर आफ्रिदीला निवृत्त होण्यास भाग पडेल. सलामीच्या सामन्यात आफ्रिदी 'सामनावीर' ठरला; तर धोनीला संघास विजयी करता आले नाही. या पार्श्वभूमीवर या लढतीपूर्वी मात्र आफ्रिदीवर नव्हे तर धोनीवर दडपण असेल.

Vo.3:- विश्वकरंडक टी -२० स्पर्धेत उभय प्रतिस्पर्धी चार वेळा आमने-सामने आले आहेत. चारही सामन्यात भारताची सरशी झाली आहे. दुसरीकडे  ईडन गार्डनवर भारताविरुद्ध चारही वन-डे मध्ये पाकिस्तानने बाजी मारली आहे. यापैकी कोणती यशोमालिका खंडित होणार ही उत्सुकता आहे.

PTC.:- व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल जाधव सह मी अनिकेत वाणी IBN-LOKMAT पुणे.  


बेहराम कॉन्ट्रॅक्टर...

बेहराम कॉन्ट्रॅक्टर
दर शनिवारी सकाळी, मुंबईतील एक ज्येष्ठ लेखक बेहराम काँट्रॅक्टर टाइपरायटर घेऊन साप्ताहिक स्तंभ लिहित असत. त्या स्तंभाचे (कॉलम) नाव राउंड अँड अबाऊट. ते बिझीबी या नावाने लिहित असत. द आफ्टरनून डिसपॅच अँड कुरियर या सायंदैनिकासाठी त्यांचे हे लेखन होते. त्याच दिवशी लिहून त्याच दिवशी प्रसिद्ध होणारा त्यांचा हा स्तंभ होता. सकाळी साडेपाच वाजता टाइम्स ऑफ इंडिया त्यांच्या घरी येत असे व त्यांनी टीका टिप्पणी करायला विषय मिळत असत. शनिवारचे राउंड अँड अबाउट वेगळे होते व ते अँड फऑर अ सॅटर्डे अ फ्यू स्ट्रे थॉटस अँड फ्यू जनरल ऑब्झर्वेशन्स या ओळींनी सुरू होत असे. या ओळीनंतर ते अनेक मते मांडत असत. काहीवेळा ती एका ओळीत काही वेळा दोन ओळीत असत. प्रत्येक ओळ लाइक या शब्दाने सुरू होत असे. उदा. लाइक देअर इज नो बिझीनेस लाइक मुव्ही बिझीनेस . इफ यू डू नॉट बिलीव्ह मी  गो सी डॉ. झिवागो अट द रीगल धीस इव्हिनिंग, पुस्तके व चित्रपट तेवढीच चांगली आहेत असे उदाहरण झिवागो यांच्या बाबतीत होते,
 बिझीबी म्हणजे बेहराम काँट्रॅक्टर यांचे एक वैशिष्ट्य होते ते त्यांना तसे का वाटते याचे स्पष्टीकरण करीत असत. पण ते वाचकांना काही गोष्टी माहिती व्हाव्यात असे समजून लिखाण करीत असत. त्यांचे लिखाण सोपे व साधे होते व त्यांचा दृष्टिकोन हा सामान्य विवेकावर आधारित होता, त्यात युक्तीवाद फार नसायचा. त्यांच्या शनिवारच्या स्तंभाचा शेवट नेहमी अँड द फायनल पॉइंट ऑफ व्ह्यू या वाक्याने होत असे व सुरूवात दॅटने होत असे websitewww.busybeeforever.com
ऑक्टोबर 1996 मध्ये त्यांनी शेवटचे वाक्य लिहिले होते की, दॅट आय हॅव ऑबझर्व्हिंग  मि. बाळासाहेब ठाकरे . इन द बिगीनिंग ही वॉज अगेन्स्ट साउथ इंडियन्स देन अगेन्स्ट गुजरातीज देन मुस्लिम्स अँड नाऊ ही इज अगेन्सट जजेस.

बिझीबी यांनी 36 वर्षे लिखाण केले. 1955 मध्ये त्यांनी सुरू केलेले लिखाण नंतर थांबले त्यांचा 2001 मध्ये मृत्यू झाला.इंग्रजीत शैलीदार व व्यक्तीगत अनुभवाधारित लिखाण करणारे ते स्तंभलेखक होते. हेमिंग्वे प्रमाणेच त्यांना लिखाणाचा सूर लहान वयातच सापडला होता. कमी जागेत जास्त विचारसंपन्न लिखाण त्यांनी केले. कमी शब्दात लिखाण त्यांना साधले होते. आपली मते नेहमीच सारखी नसतात ती एकमेकांशी जुळत नाहीत पण ते आपल्या मतांवर ठाम होते, त्यामुळे त्यांनी बिझीबी हे पात्र निर्माण केले. काही गोष्टींबाबत कुतूहल असलेला माणूस व त्याची जाणून घेण्याची इच्छा त्यातून प्रतीत होते. लिहिण्यापूर्वी ते विचार करूनच शब्द वापरीत असत, त्यांनी त्यांच्या लिखाणाचे एक जग निर्माण केले होते. त्यांना मुले नव्हती तरी ते डॅरिल व डेरेक या मुलांविषयी ते लिहीत. त्याचा एक बोलका कुत्रा बोलशोई कुत्रा होता त्याचे नाव बॉक्सर. त्यांचे गुजराती शेजारी होते ते श्रीमंत व सतत कशा बद्दल तरी गूढ बाळगत असत, या शेजाऱ्याला ते आमच्या 26 व्या मजल्यावरील माझा मित्र असे संबोधित असत. राऊंड अँड अबाऊट हा दक्षिण मुंबईशी संबंधित स्तंभ होता. इतर उपनगरांचा उल्लेख त्यात येत नसे खरेतर जास्त लोक तर याच भागात रहात असत. बिझीबी यांना ब्रिटीश काळातील मुंबई हीच खरी मुंबई असे त्यांना वाटत असे. आल्डस हक्सले याने 1920 मध्ये जेसलिंह पायलेट हे पुस्तक लिहिले होते तशीच शैली बिझीबी यांची होते. उपनगरांची वसाहत सुरू झाली तेव्हा त्यांनी त्यातील दोष दाखवले होते. मुंबई थांबते तेव्हा उपनगरे सुरू होतात असे ते म्हणत असे. बिझीबी यांना काही बाबींमध्ये रस होता त्यामुळे त्यांचे लेखन व्यापक होते. रेस्टॉरंटवर ते लेखन करीत असत त्यांचे खानपानातील ज्ञान खूप होते त्यांना अन्नपदार्थांविषयी स्तंभ चालवण्यास आवडत असे. त्यांनी केलेले अन्नाचे वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटत असे. दक्षिण मुंबईतील अनेक रेस्टराँ त्यांना त्यांच्या हॉटेलविषयी लिहण्यासाठी आमंत्रित करीत असत. उच्चभ्रू संस्कृतीविषयी ते लिहित नसत. अभिजात किंवा शास्त्रीय व हिंदुस्थानी संगीतावर लिहिण्याच्या वाटेला ते गेले नाहीत. त्यांना नाटक, चित्रपट यात रस होता ते एडवर्ड एच फिपसन या नावाने चित्रपट व नाटके यांचे रसग्रहण करत असत. त्यांना सांगितिका आवडत असत. दिवस रात्रीचे क्रिकेट प्रेक्षकांना आकर्षित करण्यास चांगले असे त्यांचे मत होते. एक तर त्यावेळी शांतता असते व केवळ दिवे चमचमत असतात. अतिशय नाट्यमय असे वातावरण त्यात असते. नाटकासारखे वातावरण तिथे तयार होते. स्क्रीनवर थर्ड अंपायरने दिलेला निकाल त्यांना मैदानावरील अंपायरपेक्षा जास्त भावत असे पण त्यावेळी पडद्यावर निर्णयाची पद्धत सुरू झालेली नव्हती.बिझीबी हे एकाकी होते पण ते त्या काळात पत्रकारितेत मुलाखती घेणाऱ्या मोजक्या चांगल्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी एकदा राज्यपाल पी.सी.अलेक्झांडर यांची मुलाखत घेतली होती, तेव्हा राज्यपाल दाढी करताना आल इंडिया रेडिओच्या बातम्या एकतात असे सत्य त्यांनी उघड केले होते. ब्रिटीश काळावर त्यांचे प्रेम होते बालपणच्या मुंबईविषयी लिहिताना ते स्मरणरंजनात जात असत 1930 ते 1940 चा तो काळ होता. फोर्ट भागातील बाजार व दुकाने त्यांना आवडत. तिथे इतिहासाला भूगोल भेटतो असे ते म्हणत असत. आता शहराची जी अवस्था आहे त्याबाबत त्यांच्या मनात कडवटपणा नव्हता. ज्यांनी राज्य केले त्या भारतीयांनीच मुंबईची वाट लावली. खलीद हसन जसे पात्रे जिवंत करीत असत तीच शैली बिझीबी वापरत असत त्यांनी पारशी समाजाविषयी फारसे लिहिलेले नाही. मुंबईत समाजाने जे काम केले होते त्याविषयी मात्र त्यांनी लिहिले होते. ते एकेठिकाणी म्हणतात की, मी पहिली पारशी व्यक्ती पुतळ्यांमधून पाहिली. त्यांच्या मते सर्व भारतीय एकच आहेत. राजकारण व राज्यकारभाराच्या नावाखाली किंवा कायद्याच्या नावाखाली काही चुका होत आहेत. त्यांचे लेखन निराशावादी कधीच नव्हते व त्यामुळे ते लोकांना आवडत असे. काहीवेळा ते खरे असायचेच असे नाही. बिझीबी यांचा विवाह फरझाना नावाच्या महिलेशी झाला होता. त्या अप्पर क्रस्ट नावाचे नियतकालिक चालवित असत. त्यांनी दुपारी जो पेपर निघायचा त्यातूनच हे नियतकालिक सुरू केले पण बेहरामच्या मृत्यूनंतरही मालकाला दिले नाही. बेहराम काँट्रॅक्टर हे सडपातळ अंगकाठीचे होते, रंगीत टी शर्ट स्लॅक्स ते घालत असत व नेहमी शांत असत. निरीक्षण करीत असत. कार्यालयात त्यांना स्वतंत्र खोली नव्हती, पन्नासच्या सुमारास ते मिडडे मध्ये काम करीत होते. खालीद ए एच अन्सारी यांच्याबरोबर त्यांनी एक पेपर सुरू केला. एकदा टॅक्सी न मिळाल्याने ते रस्त्यावरच झोपले होते.

रोमन कॅथलिक सर्वांत मोठा धार्मिक समाज आहे.

रोमन कॅथलिक हे जगातील सर्वांत मोठे ख्रिस्ती चर्च आणि सर्वांत मोठा धार्मिक समाज आहे. १९८०  मध्ये ४३७.४ कोटी लोकसंख्येपैकी १४३.३ कोटी (३२.८%) ख्रिस्ती होते. यांपैकी ८०.९ कोटी (५६.४५%) रोमन कॅथलिक व बाकीचे प्रॉटेस्टंट पंथीय व ईस्टर्न ऑथोंडॉक्स आहेत (डी. वी. बॅरेट, वर्ल्ड ख्रिश्चन एनसायक्लोपीडीया, ऑक्सफर्ड, १९८२). भारतातील ख्रिस्ती लोकांपैकी बहुसंख्य रोमन कॅथलिक असून संपूर्ण भारतात रोमन कॅथलिकांचे १.०३ कोटी सभासद आहेत आणि त्यांपैकी महाराष्ट्रात ८ लक्ष सभासद आहेत.

गात १९८२ मध्ये रोमन कॅथलिक चर्चमध्ये ३.८४४ बिशप; ,११,०७४ धर्मगुरु; ,५२,०४३ सेवाभगिनी (सिस्टर्स) आणि ७०,६२१ सेवाबंधू (ब्रदर्स) होते. त्यांपैकी भारतात १९८२ मध्ये रोमन कॅथलिक चर्चचे १२५; बिशप; ११,९९१ धर्मगुरु; ४९,९५६ सेवाभगिनी आणि २,८०१ सेवाबंधू होते (सी. बी. सी. आय्. प्रकाशित, दी कॅथलिक डिरेक्टरी ऑफ इंडिया, १९८४). ख्रिस्ताच्या सेवाधर्माने प्रेरित होऊन रोमन कॅथलिक चर्चच्या अनेकविध सेवासंस्था सर्व जगभर निर्माण झाल्या. रोमन कॅथलिक धर्मगुरु, सेवाभगिनी व सेवाबंधू हे सर्व ब्रह्मचर्याचे आमरण व्रत स्वीकारतात व अनेक शैक्षणिक संस्था, रुग्णालये, दवाखाने, वृद्धाश्रम, अनाथालये, महारोगनिवारण केंद्रे गृहप्रशिक्षण केंद्रे इ. चालवीत असतात.

'कॅथलिक' हा शब्द ग्रीक शब्द 'काता’ (सर्व भाग व्यापून सर्व समाविष्ट करुन) आणि 'होलोन' (म्हणजे पूर्ण) यांपासून आला आहे. म्हणून 'कॅथलिक' या शब्दाचा अर्थ 'सार्वजनिक' किंवा 'जागतिक' असा होतो. 'रोमन' शब्द असे दर्शवितो, की येशू ख्रिस्ताने आपल्या बारा धर्मदूतांचा म्हणजे अपॉसल्सचा नेता म्हणून नेमणूक केलेल्या सेंट पीटरचा वारस पोप हाच रोमचा बिशप असून रोमन कॅथलिकांचा प्रमुख धर्मगुरु असतो.

कॅथलिक चर्चचा इतिहास : येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि पुनरुस्थान जेथे झाले, त्या जेरुसलेममधील ज्यू लोकांमध्ये ख्रिस्ती चर्चची सुरुवात झाली. पहिल्या शतकातच येशूने निवडलेल्या शिष्यांनी पश्चिम आशियात, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील देशांत व दक्षिण भारतातही या चर्चचा प्रसार केला. पहिली तीन शतके ख्रिस्ती समाजाचा खूच छ्ळ झाला; कारण ख्रिस्ती लोक रोमन साम्राज्याचे दैवीपण मानीत नव्हते. कॉंन्स्टंटीन सम्राटाने (कार. ३०६-३७) चर्चला ३१३ मध्ये स्वातंत्र्य बहाल केले. या सम्राटामुळे चर्च व राज्य यांत जवळीक निर्माण झाली. वेगवेगळ्या देशांत कमीअधिक फरकाने हेच घडले. या काळाचा शेवट फ्रेंच राज्यक्रांती ने (१७८९) झाला. कॉन्स्टंटीनच्या नंतरच्या काळात कॉन्स्टँटिनोपलला (सध्याचे इस्तंबूल) वाढत्या राजकीय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. हळूहळू काही अंतर्गत समस्यांमुळे अकराव्या शतकात ख्रिस्ती चर्चमध्ये बहुतेक पश्चिम लॅटिन (रोम) आणि बहुतेक पूर्व ग्रीक (कॉन्स्टँटिनोपल) अशी दुफळी झाली. ऐक्याचे अनेक प्रयत्न करुनही ही दुफळी आजपर्यंत कायम राहिली आहे. अशीच एक दुफळी १३७७ ते १४१७ पर्यंतच्या काळात रोमच्या कॅथलिक चर्चमध्ये झाली होती; मात्र ही महान दुफळी (ग्रेट सीझम) सुदैवाने लवकरच नाहीसी झाली.

कॅथलिक चर्चने मठांद्वारे पाश्चिमात्य ख्रिस्ती संस्कृतीचा पाया घातला; परंतु कालांतराने चर्च श्रीमंत झाले आणि बरेच धार्मिक पुढारी धार्मिक बाबींपेक्षा भौतिक संपत्तीची आणि कलेचीच काळजी वाहू लागले. परिणामतः प्रॉटेस्टंट चळवळ उदयास आली. बहुतेक उत्तर यूरोप कॅथलिक चर्चपासून विभक्त झाला. शिकवणुकीच्या बाबतीत प्रॉटेस्टंट लोकांनी केवळ विश्चास, केवळ बायबल व केवळ कृपा (ग्रेस) यांवरच भर दिला आणि दुसऱ्या बाजूस कॅथलिकांनी विश्वास आणि कार्ये. बायबल आणि परंपरा, कृपा आणि मानवी सहकार्य यांवर भर दिला. पहिली भूमिका भावातीत परमेश्वराकडे लक्ष देते, तर दुसरी भूमिका देव व मानवाचा देवास प्रतिसाद यांकडे लक्ष केंद्रित करते. मध्ययुगीन काळात राज्य व चर्च एकत्र येऊन धर्माबाबत वेगवेगळा विश्वास व्यक्त करणाऱ्यांचा विरोध करु लागले व कधीकधी शक्तीचा शोचनीय वापरही करु लागले. त्यासाठी अमलात आणले गेलेले इन्किझिशन जर्मनीमध्ये सोळाव्या शतकात, तर स्पेन व पोर्तुगालमध्ये थेट एकोणिसाव्या शतकात संपुष्टात आले.

प्रॉटेस्टंट क्रांती उदयास यायच्या अगोदरसुद्धा धर्मसंघांच्या (रीलिजस ऑर्डर्स) साहाय्याने कॅथलिकांचे नूतनीकरण सुरु झाले होते. प्रॉटेस्टंट क्रांतीच्या आधी बेनेडिक्टिन संध (सहाव्या शतकात), फ्रान्सिस्कन व  डॉमिनिकन (बाराव्या शतकात) असे मोठे धार्मिक संघ होते. प्रॉटेस्टंट क्रांतीच्या काळात जेझुइट संघ (सोळाव्या शतकात) स्थापन झाला. धर्मप्रसाराच्या कार्याद्वारे सोळाव्या शतकापासून मध्य व दक्षिण अमेरिका कॅथलिक झाले आणि जगातील इतर काही भागांत कॅथलिक धर्मसमाज प्रस्थापित करण्यात आले. यानंतरच्या शतकात रोमन कॅथलिक चर्चला कॅथलिक राजे व सम्राटांविरुद्ध लढा द्यावा लागला. नव्या प्रबोधनाचे आगमन, बुद्धिवाद वा विवेकवा (रॅशनॅलिझम), प्रत्यक्षार्थवाद (पॉझिटिव्हिझम) आणि आधुनिक विज्ञान यांनी प्राचीन धर्मांना व रोमन कॅथलिक चर्चलाही आव्हानच दिले होते. निरीश्रवादी असलेला साम्यवाद सर्व धर्मांच्या आणि म्हणूनच कॅथलिक चर्चच्याही विरोधात आहे [ प्रबोधनकाल, मार्स्कवाद].

पल्या अधिकाराची अंमलबजावणी करण्याच्या पोपच्या पद्धतीत अनेक शतकांच्या कालावधीत हळूहळू वाढ झाली; बदल झाला. पहिल्या व्हॅटिकन परिषदेने (१८६९-७०) जाहीर केले, की काही विशिष्ट संदर्भात पोपच्या अधिकारात दिलेली शिकवण बिनचूक आहे, याचा अर्थ मात्र असा होत नाही, की ते स्वतः जीवनात चुकू शकत नाहीत किंवा त्यांच्याकडून पाप घडू शकत नाही. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने (१९६२-६५) पहिल्या व्हॅटिकन परिषदेतील ह्या ठरावास दुजोरा दिला आणि पुढे असेही सांगितले, की पोपसह सर्व बिशपांनाही ह्या अधिकारात वाटा आहे.

 वेगवेगळ्या काळांत पोपवर वेगवेगळा राजकीय परिणाम होत होता. अनेक वेळा राजेसम्राटांच्या आज्ञांमुळे व राज्य आणि चर्चचे निकटचे संबंध असल्यामुळे राजकीय सत्तेपासून चर्चला स्वतंत्र राहता आले नाही. चर्चला दिलेल्या जमिनीच्या देणग्यांतून-विशेषतः मध्य इटलीमध्ये-पोपची राज्ये (पेपल स्टेट्स) प्रस्थापित होऊन वाढत गेली. राज्याचे प्रमुख म्हणून पोप हे प्रादेशिक राज्यकर्तेही होते. १८७० मध्ये पोपची राज्ये इटली राज्यात विलीन करण्यात आली. १९२९ च्या 'लॅटरन करारा' द्वारे व्हॅटिकन राज्य व्हॅटिकन सिटी प्रस्थापित झाले आणि पोप व इटली यांतील वाद मिटविण्यात आला. पोपचे स्वतंत्र राज्यही असल्याने त्यांचे प्रतिनिधी (पेपल नुन्शियो) वेगवेगळ्या राजधान्यांत आढळतात.

नेकदा रोमन कॅथलिक चर्चने नवीन काळाच्या आवाहनांना तोंड देताना बचावात्मक भूमिका स्वीकारलेली होती; परंतु दुसऱ्या व्हॅटिकन परिषदेने जागतिक मूल्यांची उघडपणे चर्चा करण्याची चळवळ पुढे आणली. चर्चच्या इतिहासात प्रथमच बिशपांच्या या परिषदेमध्ये वैविध्यपूर्ण असलेल्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व होते. मध्य यूरोप व आफ्रिकेतील बिशपांकडून या परिषदेत प्रामुख्याने पुरोगामित्वाचा जोरदार पुरस्कार झाला.

ध्या कॅथलिक लोकांमध्ये रोमन कॅथलिकांशिवाय ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन, जुने कॅथलिक (पहिल्या व्हॅटिकन परिषदेनंतर रोमन कॅथलिकांपासून विभक्त झालेला लहानसा गट) आणि इतर काही प्रॉटेस्टंट चर्च यांचा समावेश करतात. रोमन कॅथलिकांमध्ये उपासनापद्धती व विधींच्या फरकाप्रमाणे वेगवेगळे गट आहेत. पूर्वी लॅटिन भाषा व उपासनापद्धत अवलंबिणाऱ्यांचा सर्वांत मोठा गट होता; मात्र आता या लॅटिन गटातल्या लोकांना प्रादेशिक भाषांतून उपासना करता येते. भारतात लॅटिन उपासनापद्धतीशिवाय कॅथलिक सिरो-मलबार आणि सिरो-मलंकार उपासनापद्धती केरळ भागात आढळतात [ मार्थोमाइट पंथ (चर्च)].

रोमन कॅथलिक शिकवण आणि जीवन : रोमन कॅथलिक स्वतःस येशू ख्रिस्ताने आणि त्याच्या धर्मदात्यांनी बायबलमधून दिलेल्या शिकवणुकीचे जतन करणारे आहोत असे समजतात व या अर्थाने ते स्वतःस 'सनातनी' मानतात. याच संदर्भात बायबलचे नियमसिद्ध मूळ ग्रंथ (कॅनॉनिकल बुक्स) कोणते, हे कॅथलिक चर्चने ठरविले आहे. ते ख्रिस्ती संतांच्या ठायी, तसेच येशूची आई मेरी हिच्या ठायी आदर दाखवितात. ते धार्मिक पुतळे व चित्रे यांचाही वापर करतात; परंतु संतांची व पुतळ्यांची पूजा मात्र करीत नाहीत. चर्चही अधिकृतपणे कुटुंबनियोजनाच्या नैसर्गिक पद्धतीस उत्तेजन देते, तर कृत्रिम साधनांच्या वापराबद्दल मात्र विरोध दर्शविते. बाप्तिस्मा, दृढीकरण, प्रायश्चित्त, ख्रिस्तप्रसाद अथवा प्रभुभोजन, विवाह, गुरुदीक्षा व अंत्यविधी असे एकूण सात संस्कार कॅथलिक चर्चमध्ये मानले जातात. त्यांपैकी ख्रिस्तप्रसाद युखेरिस्ट ही कॅथलिकांची पमुख उपासना आहे. ही उपासना फक्त कॅथलिक धर्मगुरुच करु शकतात व इतर सभासद तीत सहभागी होतात.

लित, उपेक्षित व गरीब बांधवांच्या मुक्तीसाठी चर्च प्रोत्साहन देते. ही गोष्ट विशेषतः दक्षिण अमेरिकेत दिसून येते. त्याचप्रमाणे ख्रिस्तेतर धर्मियांबरोबर घडून आणलेल्या सुसंवादाद्वारे प्रत्येक संस्कृतीतील सत्यम्, शिवम्, सुंदरमची जपणूक करण्यास चर्च प्रोत्सान देते. आजच्या काळातील कॅथलिकांची ही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. सर्व ख्रिस्ती चर्चमध्ये ख्रिस्ती ऐक्याची चळवळ दृढ होत आहे.

कराव्या शतकातील रोमन कॅथलिक आणि ईस्टर्न-ऑर्थोडॉक्स चर्च यांमधील बहिष्कार उठविण्यात आला आहे आणि हे ऐक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. रोमन कॅथलिक व अँग्लिकन, तसेच रोमन कॅथलिक आणि ल्यूथरन यांच्या  एकत्रित होणाऱ्या अधिकृत सभांमधून असे दिसून येते, की या मंडळांमध्ये सोळाव्या शतकात असलेले मूलभूत मतभेद आता जवळजवळ राहिलेले नाहीत. उर्वरित काही मतभेदांवर सध्या त्यांच्यात विचार चालू आहे. यामुळे सर्व ख्रिस्ती मंडळांमध्ये अधिकाधिक ऐक्य घडून येण्याची आशा निर्माण झाली आहे.

पहा : ख्रिस्ती धर्म; ख्रिस्ती धर्मपंथ; धर्मसुधारणा आंदोलन; प्रॉटेस्टंट.  

संदर्भ : 1. Adam, Karl, The Spirit of Catholicism, New York, 1962.
    2. Daniel-Rops, Henri, History of the Church of Christ, Vols. 1-15, New York, 1962-67.
    3. Rahner, Karl and others, Ed. Sacramentum Mundi, An Encyclopaedia of Theology, Vols. 1- 16. Bangalore, 1975.
    ४. लेदर्ले, मॅथ्यू रा. ख्रिस्तमंडळाचा संक्षिप्त इतिहास, पुणे, १९६३.