सोन्याचे दर सध्या विक्रमी उच्चांकावर पोहचले आहेत.
भारतासारख्या देशात सोन्यात आज गुंतवणुकीत अनेक पर्याय उपलब्ध असून
मध्यमवर्गीयांना खिशाला परवडतील अशा गोष्टी आपण जाणून घेऊयात.
भारतात पारंपारिकपणे सोन्याला खूप महत्त्व आहे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण शुभ मानलं जातं. सोन्याच्या दागिन्यांसाठी भारताइतकी वेड क्वचितच इतर कोणत्याही देशात आढळून येईल. शिवाय, सोने नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. आता काळ बदलला असून लोक पारंपारिक सोन्यापेक्षा डिजिटल सोन्याकडे अधिकाधिक वळत आहेत. लॉकर किंवा सुरक्षिततेची चिंता न करता तुम्ही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता.
डिजिटल इंडियाच्या काळात मोबाईल
अॅप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्म सारखे अनेक पर्याय असून त्या द्वारे ग्राहक खरेदी
शकता,
अगदी कमी रकमेत देखील. दुसरीकडे, नियमित सोने खरेदी करणे, त्याची शुद्धता तपासणे
आणि घरात ठेवणे यात अडचणी निर्माण करते. म्हणूनच, आता बरेच लोक डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत आहेत. अनेकांना
प्रश्न पडतो की खरा फायदा कोणता आहे: डिजिटल सोने की पारंपारिक सोने खरेदीला
प्राधान्य देणे? चला समजावून घेऊया.
डिजिटल सोने खरेदीचे काय
फायदे आहेत?
आजकाल, मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक पारंपारिक सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत आहेत. डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला ते खऱ्या सोन्यासारखे घरी साठवण्याची गरज नाही. तुम्ही तुम्हाला हवे तेवढे सोने खरेदी करू शकता, अगदी १०० रुपयांचेही. ही गुंतवणूक २४ कॅरेट शुद्ध सोन्यात केली जाते.
पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून डिजिटल सोन्याची खरेदी करता येते, जे घरपोच उपलब्ध होते आणि भविष्यात गरज भासल्यास ते सहजरित्या विकले जाऊ शकते. डिजिटल गोल्ड बॉंड सारखा देखील ग्राहकांसमोर उपलब्ध आहे. सोने सुरक्षित तिजोरीत ठेवण्याची गरज नसल्याने ते चोरी किंवा नुकसान होण्याची भीती नसते. शिवाय, ते गुंतवणूक सरळता निर्माण करते, म्हणजेच गरज पडल्यास ते लवकर रोखीत रूपांतरित केले जाऊ शकते. यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय बनतो.
पारंपारिक सोने खरेदीचे फायदे?
डिजिटल सोन्याच्या तुलनेत, पारंपारिक सोने खरेदीचेही फायदे आहेत.
डिजिटल सोने डिजिटल पद्धतीने साठवले जाते. तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकत नाही
किंवा वापरू शकत नाही. लग्नसराई, सणसमारंभ आणि घरगुती
कार्यक्रमात महिलांना याचे अधिक आकर्षण असल्याने ते अंगावर परिधान करता येतात. लोक
ते केवळ गुंतवणूक म्हणून पाहत नाहीत तर कुटुंबाची मालमत्ता म्हणून देखील याकडे
पाहतात.
सोन्याचे दागिने कर्ज
मिळविण्यासाठी सहजपणे तारण ठेवता येतात. जेव्हा बाजारभाव वाढतात तेव्हा ते नफा
मिळविण्यासाठी विकता येतात. बरेच लोक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी भौतिक स्वरूपातील
सोने अधिक खरेदी करतात कारण त्यांना त्यात स्थिरता वाटते पण तितकेच ते धोक्याचे
देखील आहे. जर तुम्हाला सुरक्षित मालमत्ता हवी असेल तर डिजिटल सोने श्रेयस्कर आहे.
दुसरीकडे, परंपरा आणि भावनिक मूल्याच्या बाबतीत,
सामान्य सोने अजूनही त्याचे स्थान राखून ठेवते.
भारतीय संस्कृतीसाठी सोने म्हणजे मान, सन्मान, प्रतिष्ठा मानली जाते. त्याचा संचय करणे व शुभ प्रसंगी त्याचे आभूषणांच्या रूपात प्रदर्शन करून त्याद्वारे स्वत:ची कीर्ती वाढवणे, श्रीमंतीची ताकद दाखवणे, उच्च सामाजिक स्तराचा पुरावा देणे आणि यासगळ्यासाठी सुवर्णाहून श्रेष्ठ इतर काही क्वचितच मानले जात असे. त्यामुळे त्याकाळी गुंतवणूक म्हणून त्याचा वापर वा व्यापार हा काही विशिष्ट सामाजिक, व्यापारी वर्ग करत असे. या धातूच्या संचयनाला ‘डेड इन्व्हेस्टमेंट’ म्हणून बोल लावले गेले. परंतु परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. भारतातील त्याच्या, प्रती – तोळा किंमतीचा चढता आलेख बघितला तर आजच्या अर्थव्यवस्थेत याहून अधिक फायदेशीर गुंतवणूक अभावानेच सापडेल.



No comments:
Post a Comment